समाजकारणासाठी राजकारणात जाण्याचा विचार करेन – अमित ठाकरे

Amit Thackeray

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या घेऊन येणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. आणि त्याला राज ठाकरे यांच्याकडूनही योग्य तो प्रतिसाद दिला जात आहे. एकीकडे काका मुख्यमंत्री तर भाऊ आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे मंत्री झाले. त्यामुळे आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही राजकरणात उतरतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र आता याबाबत खुद्द अमित ठाकरे याची सूचक विधान केले आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा मी अजून विचार केलेला नाही. समाजकारण यालाच मी राजकारण मानतो. पण राजकारणात येऊन विधिमंडळ आणि संसदेत गेल्यास लोकांचे प्रश्न अधिक तीव्रतेने सोडवता येतात, प्रश्नांकडे लक्ष वेधता येते हे जे तुम्ही सांगत आहात त्याचा मी विचार करेन. यापैकी एका सभागृहात जायचं ठरवलं तर ते मी तुमच्यामुळे जाईन, असं सूचक विधान अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले आहेत. टीव्ही 9 प्रतिनिधीला मनसे नेते अमित ठाकरे यांनी खास मुलाखत दिली आहे. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, कोरोना (Corona) काळात डॉक्टर्स-नर्सेस-विद्यार्थी-आशा वर्कस यांचे प्रश्न सोडवणे ही काळाची गरज होती. हे घटक पहिल्या फळीवर इतकं काम करीत होते, त्यांचे प्रश्न सोडवणे मला गरजेचे वाटले. मी अलीकडच्या काळात मीडियासमोर आलो नाही, पण माझं काम थांबलं नव्हतं. प्रश्न ‘कृष्णकुंज’वर सुटतो हे आताचे नाही, राजसाहेब आधीपासूनच लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि ते सोडवण्याची भूमिका घेतात, असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावर अमित ठाकरे यांनी ‘आरे लढा’ यशस्वी झाल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आभार मानले. मला एक आवडलं की प्राण्यांना हा संसर्ग होत नाही. निसर्गासाठी खूप चांगलं झालं. प्रदूषण खूप कमी झालं. माझ्या घरातून बोरिवलीचे डोंगर दिसायचे. पण लोकांचं आर्थिक नुकसानही खूप झालं. त्याचे वाईट वाटते, असंही अमित ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे.

मुंबईचे (Mumbai) नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं एकवेळ चालेल. आदिवासींनी मुंबईकरांनी आरे वाचवण्यासाठी लढा दिला, त्यांच्या मागणीला न्याय देणं खूप गरजेचं होतं. आरेची झाडे कापली गेली त्याचा मोठा फटका बसला आहे. प्रदूषण वाढतंय. हे लोकांना आता कळणार नाही. पण कारशेडचा मोठा फटका नक्कीच बसला असता. या निर्णयाबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी अजून तरी बोलणं झालेलं नाही. आंदोलकांशीही बोलणं झालेलं नाही. पण आमचं मत होते की जी झाडे कापली गेली तिथे पुन्हा झाडे लावण्यात यावीत. पुढच्या एक-दोन दिवसांत आरेत जाऊन एक झाड लावण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं आहे.

मंदिरे-ग्रंथालये उघडली गेली पाहिजेत, जर तुम्ही मॉल उघडता तर ह्या गोष्टीही उघडल्या गेल्या पाहिजेत. मुंबई- महाराष्ट्र पुन्हा उघडला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीत असणार. पण मला वाटतं की साडेपाच महिने महाराष्ट्र बंद ठेवल्यानंतर, राज्य आता हळूहळू उघडलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने सगळं चालू गेलं पाहिजे पण आता चालू करा, अशी मागणीही अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER