तानाजी मालुसरेसारखा आहे, प्रत्येक संकटातून बाहेर येईन – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik

मुंबई :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांच्या मुलाची ईडी चौकशी सुरू आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले, मी तानाजी मालुसरेसारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईन.

प्रताप सरनाईक म्हणाले, पराग शहा, सुधाकर शेट्टी, मंगलप्रभात लोढा, अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) यांची संपत्तीही अमाप आहे. अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) संपत्ती तपासली का? हिमाचलची पोरगी मुंबईत संपत्ती कमावते. त्याचे काय?

ईडी सांगेल तेव्हा चौकशीला जाईल
मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी बोलावेल तेव्हा मी चौकशीला जाईन. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. माझ्या पत्नी आणि मुलांना या प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचे दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले.

भाजप विरुद्ध आघाडी लढाई
ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भापजच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार ५ नव्हे, २५ वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

योग्यच होईल : विहंग
विहंग सरनाईक म्हणाले, जे होईल ते योग्यच होईल. सत्यमेव जयते. माझी पत्नी आजारी असल्याने ईडीच्या चौकशीला जाऊ शकलो नाही. ईडीला पत्रं लिहून कळवले होते. तरीही नोटिसा पाठवत राहिले. त्यांनी समन्स बजावले आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER