मी पुन्हा येणार…, संकेत देत डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडले व्हाइट हाऊस

Donald Trump

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज व्हाइट हाऊस सोडले. व्हाइट हाऊस (White House) सोडल्यानंतर ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले व मी कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात पुन्हा परत येणार असल्याचे सूचक विधान केले.

ट्रम्प म्हणालेत, मी नेहमी लोकांसाठी संघर्ष करत राहणार आहे. एका वृत्तसंस्थनेने दिलेल्या वृतांत म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प लवकरच आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे वृत्त काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER