अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांचे सिद्धिविनायकाला साकडे

Ram Kadam-Arnab Goswami

मुंबई : पत्रकार अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला (Siddhivinayak) साकडे घालणार आहेत.

राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णव यांना अटक केल्यामुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून भाजप नेते आणि कार्यकर्ते या अटकेच्या निषेधार्थ रोज आंदोलन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER