देवाच्या मनात येईल तेव्हा आई बनेन

Priyanka Chopra - Nick Jonas

बॉलिवुडमध्ये (Bollywood) यशस्वी झाल्यानंतर प्रियांकाने (Priyanka Chopra) हॉलिवुडकडे (Hollywood) मोर्चा वळवला आहे. तेथे जाऊन तिने हॉलिवुडच्या गायक आणि अभिनेता असलेल्या पण तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या निक जोनासबरोबर (Nick Jonas) लग्न केले. लग्नानंतर या दोघांचे हजारोंनी फोटो सोशल मीडियावर आलेले आहेत. प्रियांका निकसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. दोघांचे तीन कधी होणार असा प्रश्नही तिला सतत विचारला जात आहे, यावर प्रथमच बोलताना प्रियांकाने म्हटले आहे की, देवाच्या मनात येईल तेव्हा मी आई बनेन.

प्रियांकाने प्रथमच फॅमिलाबाबत वक्तव्य केले आहे. प्रियांका म्हणाली, लग्नानंतर मी आणि निक एकमेकांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्ही दोघांनी ठरवले आहे की, निकने आणि मी तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ एकमेकांपासून दूर राहू नये असा नियम केला आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या कामाचे नियोजन त्याप्रमाणे करतो. आम्ही फॅमिली प्लॅनिंगबाबत चर्चा केली नाही. यावर्षी तर आम्ही दोघेही प्रचंड बिझी असणार आहोत. मी आणि निकने जे प्रोजेक्ट हाती घेतले आहेत ते अगोदर आम्हाला पूर्ण करायचे आहेत. मात्र कामासोबत फॅमिलीही महत्वाची आहे हे मला चांगले ठाऊक आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी मी निश्चितच करू इच्छिते. आणि मला पूर्ण खात्री आहे की देव जेव्हा ठरवेल तेव्हा योग्य वेळी हे होईलच. प्रियांकाचा इशारा स्पष्टपणे आई बनण्याकडे आहे हेच तिच्या या वक्तव्यातून दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या शेवटी प्रियांकाने गुड न्यूज दिली तर आश्चर्य वाटणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER