रोजच सकाळी संजय राऊतांचे नाटक, केंद्रीय महिला आयोगाने त्यांची चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

Sanjay Raut- Chandrakant Patil

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर एका महिलेने गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने (Central Women’s Commission) चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उचलून धरली. ते रोज सकाळी उठून नाटक करतात. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे आपल्याला कोणीही बघत नाही, असा तिचा भ्रम असतो. हाच संभ्रम संजय राऊत बाळगत आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केली.

ते शनिवारी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत

सावरासावर करतात, ठाकरे सरकारच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना सुनावले.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना लवकरच २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल, सोमय्या यांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button