…यासाठी अजित पवारांविरोधातील भाजपाच्या मोर्च्यात मी नव्हतो – एकनाथ खडसे

मुंबई : ‘अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) गाडीभर पुरावे आहेत. मात्र त्यांच्याविरोधात कुठलेही ठोस पुरावे नाहीत याची मला माहिती होती. त्यामुळे अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे जे नव्हतेच ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला. त्यामुळे मी या मोर्च्यात नव्हतो, असा गौप्यस्फोट भाजपसोडून राष्ट्रवादीत आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. तसेच देवेंद्र फडणीसांनी पहाटे अजितदादांसोबत शपथ घेतली त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत’ असल्याची टीकाही त्यांनी केली. खडसे हे मुंबईहून जळगावच्या दिशेने निघाले असून, वाटेत त्यांनी टीव्ही-९ला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला.

यावेळी ते म्हणाले की, मी भाजप सोडून जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट केल होतं. त्यावेळी मला थांबवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी का आग्रह केला नाही? मला थांबण्यासाठी कुणाचा फोन आला नाही. एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही, असा दावाही त्यांनी केला.

खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळते की कॅटबरी चॉकलेट मिळतं हे आम्हाला पण पाहायचं आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर खडसेंनी चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. ‘भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा उलट प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. ‘माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येणार आहेत हे महत्वाचे नाही, किती लोक निवडून आणू शकतो हे महत्वाचे आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र १०-१२ माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील, अस स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER