मी जन्माने हिंदू ; धर्माविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही – उर्मिला मातोंडकर

Urmila Matondkar

मुंबई : देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही. पण मी गरज पडेन तेव्हा धर्मानुसारच वागेन, अशा शब्दांत उर्मिला मातोंडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधत उर्मिला मातोंडकरने धर्माविषयीची तिचे म्हणणे मांडले.

मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे. अगदी लहानपणापासून मी हिंदू धर्माविषयी अभ्यास करत आली आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असे वक्तव्य शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी केले. (Urmila Matondkar on secularism and Hindutva)

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी आपण जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचे ठामपणे सांगितले.

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. त्यामुळे मला हिंदू धर्माविषयी पुरेशी जाण असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER