कुमार गौरवसोबत आणखी सिनेमे करायला हवे होते, विजयता पंडितने व्यक्त केली खंत

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये एखाद्या नायकाला लाँच करायचे असेल तर त्याला एक तर लव्ह स्टोरीतून लाँच केले जाते किंवा लव्ह अॅक्शन सिनेमातून लाँच केले जाते. ज्युबिलीकुमार म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांनी कुमार गौरवला (Kumar Gaurav) लाँच करण्यासाठी लव्ह स्टोरीचाच घाट घातला आणि १९८१ ला ‘लव्ह स्टोरी’ नावानेच सिनेमा सुरु केला. या सिनेमात कुमार गौरवच्या नायिकेच्या रुपात विजयता पंडितला (Vijayata Pandit) संधी देण्यात आली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पडद्यापासून अनेक वर्ष दूर राहिलेली विजयता पंडित आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. कुमार गौरवसोबत मला अनेक सिनेमे ऑफर झाले होते पण मी ते केले नाहीत त्यामुळे माझे नुकसान झाले अशी खंत विजयताने बोलताना व्यक्त केली.

४० वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर आलेल्या विजयताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. विजयता ही प्रख्यात अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि संगीतकारद्वय जतिन-ललितची बहिण आहे. ‘लव्ह स्टोरी’साठी कुमार गौरवसोबत एक फ्रेश चेहरा हवा म्हणून राजेंद्र कुमारने विजयताला कुमार गौरवची नायिका बनवले होते. या दोघांचा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर या दोघांचे अफेअर सुरु असल्याचेही म्हटले जात होते. मात्र कौटुंबिक संघर्षामुळे हो दोघे एकत्र येऊ शकले नसल्याचे बोलले जात होते. करिअर बहरात असतानाच विजयता पंडितने १९८६ मध्ये ‘कार थीफ’, ‘दिव्य शक्ती’, ढाल, कीमत, मैं खिलाड़ी तू अनाडी सिनेमाचा दिग्दर्शक समीर मलकानसोबत (Sameer Malkan) लग्न केले. परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर विजयताने १९९० मध्ये संगीतकार आदेश श्रीवास्तवसोबत (Aadesh Srivastav) दुसरे लग्न केले. २०१५ मध्ये आदेश श्रीवास्तवचे कँसरमुळे निधन झाले. आदेश आणि विजयताला अवितेश नावाचा मुलगा असून तोसुद्धा संगीतकार आहे. या दोघांनीही याबाबत आजवर कधीही वक्तव्य केले नाही. मात्र आता प्रथमच विजयताने याबाबतचे मौन सोडले आहे. विजयताने याबाबत बोलताना सांगितले. ‘माझा मुलगा आता मोठा झाला आहे, त्यामुळे खरे तर मला त्या विषयावर बोलायचे नाही. ती जुनी गोष्ट असून ती विसरनेच योग्य आहे. आमचा सिनेमा हिट झाल्यानंतर अनेक निर्मात्यांनी आम्हा दोघांना घेऊन सिनेमा तयार करण्याच्या योजना आखल्या होत्या. परंतु काही कारणास्तव मी ते सिनेमे करू शकले नाही त्यामुळे माझे खूप नुकसान झाले अशी खंतही विजयताने यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button