राष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ : एकनाथ खडसे

 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

Eknath Khadse

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वातावरणात सुरु झाली आहे . आता एकनाथ खडसे यांचा एका ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात खुद्द खडसे यांनीच भाजप सोडण्याबद्दल भाष्य केले आहे.

भाजपने अलीकडेच देशातील नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पण, पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना डावलण्यात आल्याने ते पक्षावर नाराज आहे .

रोशन भंगाळे नावाच्या समर्थकाने एकनाथ खडसे यांना निराश होऊन फोन केला आहे. खडसे आणि भंगाळे नावाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला हा संवाद व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये खुद्द एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याबद्दल वक्तव्य केले आहे.

‘आपल्याला तिकडे (राष्ट्रवादीत) जायचे आहे. पण, तिकडे गेल्यावर पद काही मिळणार आहे की नाही, याचा निर्णय बाकी आहे. उगाच तिकडे जाऊन लाचारासारखे बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे पद का देता याचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत तिकडे जाणार नाही’, असे एकनाथ खडसे यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे .

ही बातमी पण वाचा : दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला नव्हता ; शिवसेनेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER