शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत घेण्यासाठी मी प्रयत्न केला ; विखेंच्या आत्मचरित्रातून गौप्यस्फोट

Balasaheb Vikhe Patil - Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना काँग्रेसमध्ये (Congress) परत घेण्यासाठी मी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रातून केला आहे.

1980 मध्ये इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेते पक्षात परतत होते. शंकरराव कोल्हे आणि मधुकर पिचड यांना मी घेऊन गेलो. इंदिराजींच्या घरी त्यांचा पक्षप्रवेश नक्की झाला. त्यावेळी पिचड पवार यांच्या विरोधात सारखी गरळ ओकत होते.

बाळासाहेब विखे (Balasaheb Vikhe) यांचे सर्वाधिक आयुष्य काँग्रेस पक्षात गेलं, मात्र त्यांना काँग्रेसमध्ये अनेकदा अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागल्याचा दावा या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

शरद पवार आणि बाळासाहेब विखे यांच्यातील वाद, शिवसेनेत (Shiv Sena) जाण्याचा आणि सेना सोडण्याचा निर्णय, राजीव गांधी यांच्या विरोधात फोरम का निर्माण करावा लागला?, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व कसे होते, मनोहर जोशी आणि शरद पवार यांची मैत्री, आणि आयुष्यात 3 वेळा जीवे मारण्याचा झालेला प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेब विखे यांनी प्रकाश टाकला आहे.

राजकारणातून 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न :
बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक राजकीय गौप्यस्फोटही केले आहेत. शरद पवार यांच्या बाबतीत या आत्मचरित्रात अनेक प्रसंगी भाष्य करण्यात आलं आहे. यातून बाळासाहेब विखे यांचं शरद पवार यांच्या बरोबर कधीच पटलं नाही हे दिसून येतं. राजकारणामुळे माझ्यावर 3 वेळा कठीण प्रसंग आल्याची माहिती देताना मला 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा मोठा गोप्यस्फोट विखे यांनी केलाय. विखे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला, मात्र हा प्रयत्न कोणी केला हे जाहीर न सांगता सविस्तरपणे घटनाक्रम लिहिलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER