मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यपदाचा चार्ज घेतला; नाना पटोलेंचा टोला

Nana Patole - PM Narendra Modi

नागपूर : “या देशाला काँग्रेसच्या (Congress) विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे.” असा टोमणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला (BJP) मारला.

“भाजपाने सुशांतसिंग प्रकरणात राज्य सरकारला तीन महिने बदनाम केले. यात भाजपाचा मोठा नेता अडकला आहे. भाजपाचा नेता अडकल्यामुळे सीबीआयने अहवाल दाबून ठेवला आहे. पटोलेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. गडकरी साहेबांनी एक बंदर स्वस्तात विकले. सध्या देशात फास्टटॅग सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेतही मोठा भ्रष्टाचार आहे.” असा आरोप पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यापासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार तसेच भाजपावर वेळोवेळी टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांनाही धारेवर धरले. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षयकुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. मनमोहन सरकारच्या काळात हे सिनेअभिनेते ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अक्षयकुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER