मीदेखील नारायण राणेंच्या संपर्कात; छगन भुजबळ यांनी घेतली विकेट

Chhagan Bhujbal- Narayan Rane

नाशिक : नारायण राणे यांनी शिवसेनेचे ३५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा नुकताच केला. त्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मी स्वत:ही राणे यांच्या संपर्कात असल्याचे मिस्कील उत्तर दिले आहे. नाशिक येथे माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी हसत-खेळत ही प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांनी शनिवारी ठाण्यातील मालवणी महोत्सवाला हजेरी लावली होती. भाजपा कुणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वतःहून आली होती. भाजपाला कुणाची फिकीर करण्याची गरज नाही.

सेनेचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज असून, भाजपा पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा यावेळी नारायण राणे यांनी केला होता. याबाबत विचारता भुजबळ हसत-हसत म्हणाले, आता काय करणार? आम्ही एकमेकांशी बोलतो. सगळेच संपर्कात असून, मी स्वत:ही राणे यांच्या संपर्कात आहे!

जाणता राजा म्हणून महाराजांच्या नावाने राजकारण नको, उदयनराजेंचा पवारांना टोला