मोठ्या मनाने पराभव स्वीकारायला हवा होता, पण रडीचा डाव सुरू; पवारांचा भाजपला टोला

Sharad Pawar - PM Narendra Modi - Amit Shah

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापना होणार असंच निकालातून स्पष्ट झालं आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि ममतांचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे भाजपचे (BJP) उमेदवार शुभेंदू  अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या मतदारसंघात निर्माण झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याला ‘रडीचा डाव’ म्हणत भाजपाला टोला लगावला.

‘रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!’ असा टोला पवारांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button