मी शरद पवारांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिली; पण… अजित पवारांची कांजूरप्रकरणी प्रतिक्रिया

Kanjurmarg Metro Car Shed - Ajit Pawar

मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एमएमआरडीएला (MMRDA) कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचा आदेश देत ठाकरे सरकारला (Thackeray Government) मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र किंवा राज्य सरकार असो कोणीही विकासकामात अडथळा आणू नये. मी शरद पवारांची (Sharad Pawar) ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिली आहे. मी पण ३० वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी कधीही विकासकामात राजकारण आणत नाही. आम्ही मदतच करत असतो. पण हा निर्णय खूपच जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्यामुळेच केंद्राने टोकाचं पाऊल उचललं आहे, असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सहकारी, अधिकारी, कायदा विभाग, अॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतील. कायदा आणि नियमाला धरून जी सकारात्मक भूमिका असेल ती आम्ही घेऊ. एखाद्या न्यायालयाने अशा पद्धतीचे आदेश दिल्यानंतर त्यावर अपील करण्याची व्यवस्था आपल्या कायदा, नियम आणि घटनेत आहे. त्याचाही विचार केला जाईल. काम सुरू  करण्यासाठी जे करावं लागेल याचा विचार केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER