‘अजित दादांनी मुख्यमंत्री व्हावे ही माझी आणि कार्यकर्त्याची इच्छा’ – डॉ. अमोल कोल्हे

Amol Kolhe-Ajit Pawar

पुणे : लवकरच होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागेल, अजितदादा उपमुख्यमंत्री होणार का याचा निर्णय पवारसाहेब घेतील. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीच काय, तर मुख्यमंत्रीच व्हावे, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. असे मत राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि.पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये दिले. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, राज्याची तिजोरी किती खाली व किती भरलेली आहे, हे पाहून दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय़ झाला असल्याने त्यांनी सांगितले. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी अभिनंदन केले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र पाणीकपात का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

जनता भाजपाच्या पाठीशी आहे हे कर्नाटक पोटनिवडणुकांनी दाखवून दिले : अजित पवार

सीएए कायद्यातून भाजप हे राष्ट्रवादाला उन्मादी राष्ट्रवादाकडे नेत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. मात्र, तो सर्वसामान्य भारतीयांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर सीएए कायदा करण्यात आला आहे. मात्र, जुन्या जखमांना फुंकर घालताना नव्याने त्या होणार नाहीत, हे पाहावे, असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी केंद्राला यासंदर्भात दिला.