‘उचलली जीभ लावली’… टीका कराण्याच्या नादात वडेट्टीवार स्वतःच का होतात टीकेचे धनी?

Vijay Wadettiwar - Maharastra Today
Vijay Wadettiwar - Maharastra Today

राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे काँग्रेसच्या आक्रमक नेत्यांपैकी एक आहेत. आक्रमक भाषा शैलीमुळं ते प्रसिद्ध असले तरी अनेकदा त्यांच्या विधानांमुळं ते अडचणीत आलेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तेजीत आहे. उपाय योजनांवर विचार सुरु आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते वेगवेगळ्या स्तरांवर कोरोना नियंत्रणात कसा आणायचा याबद्दल सावध विधानं करत असताना, राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावावा ही मागणी वडेट्टीवारांनी उचलून धरलीये. राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून देखील अशी मागणी झालेली नाही. मात्र वडेट्टीवारांची लॉकडाऊबद्दल इतकी उत्सफुर्तता का आहे? असा प्रश्न आता विचारला जातोय.

‘अन्यथा मृतांचा खच पडेल’

वीकेंड लॉकडाऊनमुळं जास्तीचा फरक पडणार नाही, कोरोना (Corona) रोखायचा असेल तर तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावायला हवा, अशी भूमिका वडेट्टीवारांनी घेतलीये. यातच कोरोनाविषयी बोलताना त्यांनी नागरिकांच्या मनात धास्ती भरेल असं विधान केल्याचं बोललं जातंय.

ते म्हणाले, “वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल.” कोरोना प्रसाराची सर्वच जबाबदारी नागरिकांवर टाकणं कितपत योग्य आहे? असा ही सवाल निर्माण होतोय.

मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे वैधानिक पदावर आहेत. त्यांच्या विधानांना राज्यात गांभीर्यानं घेतलं जातं. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या भितीनं उस्मानाबादच्या नाभिक व्यावसायिकानं आत्महत्या केलीये. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण असताना मंत्र्यांनी केलेल्या अशा विधानाचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात, असं बोललं जातंय.

‘माणसं मरत आहेत मग उत्सव कशाला?’

पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची कोरोना विषयी आढावा बैठक काही दिवसांपूर्वी घेतली. या बैठकीवेळी बोलताना त्यांनी महात्मा फुले जयंती ते बाबासाहेब आंबेडकर जयंती या ११ एप्रिल ते १४ एप्रीलच्या काळात लसीकरण उत्सव राज्यांनी साजरा करावा असं आवाहन केलं होतं.

पंतप्रधानांच्या या विधानाला वडेट्टीरांनी तिखट भाषेत उत्तर दिलं ते म्हणाले, ” राज्यात लस नाही. लोक लसीची प्रतिक्षा करत आहेत. माणसं मरत आहेत. मग लसीकरण उत्सव कशाला?” असा सवाल करतानाच कोरोनावर व विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी इतकी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला.

‘डॉक्टर आणि नर्स आभाळातून पडत नाहीत’

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडल्याचं स्पष्ट दिसतंय. याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात बेड्सची कमतरता आहे. बेड्स एका दिवसात वाढवता येतीलही. परंतु, नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं,” असं आवाहनही त्यांनी केलं.

वडेट्टीवारांच्या या विधानाला विरोधी पक्षानं उत्तर दिलंय. मधल्या काळात आरोग्य विभागातील रिक्त पद का भरली नाहीत? असा सवाल करतानाच कोव्हिड सेंटरमधील नर्सेसचे पगार अजून दिले गेले नसल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांच्या निदर्शनात आणून दिलं.

‘राज्येसवेच्या विद्यार्थ्यांमुळं पुण्यात कोरोना परसला’

मागच्या मार्च महिन्यात राज्यसेवेच्या परिक्षा मोठ्या प्रतिक्षेनंतर जाहिर झाल्या होत्या. कोरोनाचं कारण देत सरकारनं या परिक्षा पुढं ढकलल्या. यामुळं पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आमदार गोपीचंद पडळकरांनी या आंदोलनाच नेतृत्त्व केलं होतं. त्यांच्या आंदोलनामुळं २१ मार्चला राज्यसेवेच्या परिक्षा घेण्यात आल्या. यावेळी “परिक्षा पुढं ढकलल्याचं मला माहिती नव्हतं. माझ्या परस्पर हा निर्णय घेण्यात आला” असं विधान वडेट्टीरांनी केलं होतं.

राज्यसेवेच्या परिक्षा पुढं ढकलल्या याबाबत कोणतीच मला कल्पना देण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांचा रोष सरकारनं ध्यानात घ्यावा असं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यानंतर एका महिन्यातच त्यांनी युटर्न घेत, “राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळंच दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा कोरोनामुळं बळी गेला.” असं सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बेजबाबदार विधान?

टिकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाबद्दल बोलताना केलेल्या विधानमुळं विजय वडेट्टीवारांना टिकेला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या घरचे तक्रार करतील इतरांनी चिंता करण्याची गरज नाही असं, ते म्हणाले होते.

“पूजा चव्हाण प्रकरणी कुणी तरी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. तक्रार करणारे हे तिचे नातेवाईक असले पाहिजेत. तिचं शोषण झालं की नाही? नेमकं काय झालं? हा काय प्रकार आहे? एकूण घटनेचं गांभीर्य काय आहे? हे पाहिलं पाहिजे. तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांना चिंता करण्याची आवश्यकता नाही,” असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते. संपुर्ण महाराष्ट्रातून पुजा चव्हाणच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त होत असताना वडेट्टीवारांनी हे विधान केलं. यामुळं त्यांना टीका झेलावी लागली होती.

ओबीसी हिताची भाषा फक्त प्रदेशाध्यक्ष पदासाठी?

मराठा समाजातील उच्च शिक्षण शिक्षण घेणाऱ्या, राज्यसेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सारथी या स्वायत्त संस्थेची स्थापना माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. त्याच धर्तीवर ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली.

पी.एच.डी.साठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत मोठी तफावत आहे. सारथीमधून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना ३५ ते ४० हजारांची शिष्यवृत्ती प्रतिमहिना पाच वर्षांसाठी दिली जाणार आहे. ३५० विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणार आहे, तुलनेत महाज्योतीनं मात्र १५० जागांसाठी जाहिरात काढलीये आणि २० हजार प्रतिमाह शिष्यवृत्ती पाच वर्षांसाठी दिली जाणार आहे. यामुळं ओबीसींबद्दल वडेट्टीवारांना असणारी आपुलकी ही खोटी आहे. प्रेदशाध्यक्ष पदासाठी आहे. अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button