मला आता मोदी सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत – संजय राऊतांचा टोला

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आता मला सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान मोटेरा स्टेडियमचा (Motera Stadium) उद्घाटन सोहळा बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला. या मैदानाचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं होतं. मात्र, उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा केली होती.

या सगळ्याबाबत संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी मुंबईत विचारणा केली असता, राऊत म्हणाले की, हा गुजरात सरकारचा निर्णय आहे, आपण त्याबाबत काय बोलू शकतो. गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मंजुरी दिली असेल. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारचे निर्णय झाले असतील तर मला माहिती नाही. पण आता मला नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

ही बातमी पण वाचा : गुजरातच्या पराजयावर काँग्रेसला मंथनाची गरज, संजय राऊतांनी पुन्हा डिवचले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER