“मी कधीही सांगितले नाही येथे येईन, पण आलो”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Fadnavis-Uddhav

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

“फडणवीस राज्याच्या हिताचा मुद्दा मांडतील तर त्यांच्या पाठीशी राहू” – रोहित पवार

आपल्या अभिनंदन भाषणापर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, ३० ते २५ वर्षांपासून असलेले आमचे मित्र आता विरोधक झाले आहेत. जे मित्र होते ते आता विरोधी बाकावर बसले आहेत. फडणवीसांसोबतची मैत्री मी कधीही लपवलेली नाही. ५ वर्षात त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो. गेल्या ५ वर्षात त्यांनी चांगलं काम केलं. चांगल्या कार्याचा कधीही विरोध केला नाही. आणि कोणतेही काम काळोखात केले नाही. बंद दाराआड काय झालं हे सांगणे आमची संस्कृती नाही. असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

जनतेच्या भल्यासाठी एकत्र काम करू. फडणवीस हे चांगले अभ्यासू नेते आहेत. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं अशी आशा आहे. “या दिवसाची मला अपेक्ष नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो. आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, २५ ते ३० वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. अशी मिश्किल टीकाही त्यांनी यावेळी केली.