माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल, किशोरी पेडणेकर हात जोडून मुंबईकरांना म्हणाल्या …

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या कोरोनावर उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान, हॉस्पीटलमधून मुंबईकरांसाठी त्यांनी एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. मास्क न वापरणाऱ्या तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसमोर अक्षरश: त्यांनी हात जोडले आहेत.

‘मास्क न वापरता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला. तुम्ही मात्र असं करू नका. कुठेही जा, बाजरात जा पण मास्क घाला. विनाकारण घराबाहेर पडू नका.’, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट हॉस्पिटलच्या बेडवरून केलं आहे. किशोरी पेडणेकर सध्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर स्वतः नर्स आहेत व अनेकदा अनेकदा त्या स्वतः हॉस्पीटलमध्ये जाऊन कोरोना रुग्णांची विचारपूस करताना आपल्याला दिसल्या आहेत. महापालिकेच्या कोविड हॉस्पीटलची स्वतः पाहणी करणा-या पेडणेकर यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वय- 58 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER