मी चुकलो!; केंद्रावर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांचा खुलासा

PM Narendra Modi - P. Chidambaram

नवी दिल्ली : केंद्राच्या कोरोना(Corona) लसीकरण धोरणावर विरोधक सतत टीका करत आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राला फटकारत लस धोरण सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, मोदी सरकारने ७ जून रोजी अर्थात काल १८ वर्षांपुढील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर पी. चिदंबरम (P.Chidambaram)यांनी मोदी सरकारवर(Modi Govt) टीकास्त्र सोडले. टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता त्यांनीच खुलासा केला आहे.

मोदी सरकारने लसीकरणासंदर्भात काल मोठी घोषणा केली. २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र घेणार आहे. यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. काही राज्यांना लस खरेदीसाठी परवानगी देण्यात आली होती, असे पंतप्रधान म्हणाले.

या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली. “पंतप्रधान मोदी आता राज्य सरकारला दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कोणीही म्हटलेले नाही.” असे म्हणत चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केले.

चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीका करता चूक मान्य केली आहे. “राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. सोशल मीडियावर एका कार्यकर्त्यांने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचे पत्र पोस्ट केले. मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केली आहे.” असा खुलासा चिदंबरम यांनी ट्विट करून केला आहे.

काय म्हणाले चिदंबरम?

१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी आता केंद्राने घेतली आहे. या घोषणेनंतर चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकार आपल्या चुकांमधून शिकले, हाच या घोषणेमागचा गर्भित अर्थ आहे. त्यांनी दोन चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःच्या चुकांसाठी विरोधकांना दोषी ठरवले. केंद्राने लस खरेदी करू नये असे कोणीही म्हणाले नव्हते. आता राज्यांवर आरोप करतायेत की, राज्यांना थेट लस खरेदी करायची होती. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली.” असे चिदंबरम म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button