… कारण मला ‘महाराष्ट्र’ आवडतो – कंगना रणौत

Kangana Ranaut

मुंबई: सुशांतसिंह आत्महत्या (Sushant Singh commits suicide) चौकशी प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी किंवा बॉलिवूड नेपोटिझम सुशांतच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप करणारी कंगना रणौत (Kangana Ranaut) पहिली अभिनेत्री ठरली होती. त्य़ानंतर अनेकांनी हे प्रकरण उचलून धरले व अखेर सुशांत आत्महत्या चौकशी प्रकरण मुंबई पोलीसांकडून सीबीआयकडे गेले. मात्र, यानंतरही कंगना रणौतचे महाराष्ट्र सरकारविरुद्ध, मुंबई पोलिसांविरुद्ध (Mumbai Police) ट्विट करणे सुरूच होते. त्यातच कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मिर संबोधल्याने मुंबईकर, बॉलिवूड, मराठी कलाकार सोशल मीडियाकर्मी सारेच तिच्या विरोधात एकवटले.

एवढेच नाही तर मुंबई एवढीच असुरक्षीत वाटत असेल तर त्यांनी मुंबईत राही नये असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच, मुंबईला भलेबूरे म्हणणा-या, मुंबईचा बाप काढणा-या कंगनावर कारवाई करण्याची शिफारसही संजय राऊत यांनी केली होती. ज्या मुंबईने बाहेरून आलेल्या कलाकारांना नाव, पैसा, प्रतिष्ठा दिली त्याच मुंबईला नावं ठेवणा-या कंगनावर शिवसेना, बॉलिवूडसह सर्वच स्तरातून टीका होऊ लागली.

हे पाहता कंगनाने अचानक यू टर्न घेतल्याचे दिसून आले. उपरती झालेल्या कंगनाने सर्वांच्या टीकेनंतर मुंबईने मला यशोदा मातेसारखे सांभाळून घेतल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर आता, कंगनाचे मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम उफाळून आले आहे.

“मला महाराष्ट्र आवडतो” असे ट्विट करत कंगनाने मराठीचे गोडवे गायले आहे. “यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. मला प्रचंड विरोध सहन करावा लागला, मी मोठा स्ट्रगल केला. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER