मी राजीव सातवला गमावले, आमचे अपरिमित नुकसान; राहुल गांधी भावूक

Maharashtra Today

मुंबई :- काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान.” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली.

“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते काँग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो.” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button