राज ठाकरे यांची शिक्षणाबाबतची आस्था आवडली – डिसले गुरूजी

Raj Thackeray

मुंबई :- ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजींनी कुटुंबियांसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि रणजीतसिंह डिसले यांची शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर दिसले म्हणाले राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिक्षण क्षेत्राबाबत दाखवलेली आस्था आवडली.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान रणजितसिंह डिसले यांनी आज कुटुंबियांसमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

रणजीतसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांनी बक्षिस मिळालेले मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केले. त्यांच्या या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे, अया शब्दात राज ठाकरे यांनी दिसले यांचा गौरव केला. रणजीतसिंह डिसले म्हणाले, राज ठाकरेंची शिक्षण क्षेत्र संबंधात असणारी प्रचंड आवड खूप चांगली वाटली. महाराष्ट्र राज्याचे नाव शिक्षणक्षेत्रात अधिक उंचावेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्यातर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांना ७ कोटी रुपये मिळालेत. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER