मनस्ताप झाल्याने भाजपा सोडली, पवारांसोबत नव्या दमाने कामाला लागणार – एकनाथ खडसे

Eknath Khadse & Sharad Pawar

जळगाव : मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या ४० वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप (BJP) जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही.

मात्र भाजपमध्ये माझा अतोनात छळ केला गेला. माझं जीवन उध्वस्त करण्याचं काम केलं. छळाला मर्यादा नव्हती. यामुळे ४ वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मला पक्ष सोडावा लागला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचा नुकताच राजीनामा दिलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली.

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, येत्या २३ तारखेला मुंबईत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने भाजपचा राजीनामा देण्यावर कुठलाही दबाव अथवा मागणी केली नाही. शुक्रवारी राष्ट्रवादीत एकटाच प्रवेश करणार असून, कुठलाही आमदार अथवा खासदार माझ्याबरोबर असणार नाही. मला राष्ट्रवादीकडून कुठल्याही पदाचे आश्वासन दिलेले नाही.

मी पदासाठी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जिल्ह्यात जोमाने कामाला लागणार आहो. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काही दिवसात महाविकास आघाडीचा सदस्य होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER