घरीच गाणं शिकलो 

I learned to sing at home

” सारेगमप ” या पहिल्या सांगतिक पर्वाचा उपविजेता इथून आपली ओळख निर्माण करणारा गायक ” मंगेश बोरगांवकर ” अनेक उत्कृष्ट गाण्यांनी रसिकांच्या मानवर अधिराज्य गाजवलेला तरुण गायक. मंगेश चा सांगतिक प्रवास हा सारेगमप या कार्यक्रमापासून सुरू झाला. आजवर अनेक मराठी चित्रपटासाठी , मालिका साठी गाणी गाऊन त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. आपल्या सुमधुर आवाजाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक उत्तम गायक म्हणून नवी ओळख त्याने निर्माण केली आहे. मंगेश चा सांगतिक प्रवास कसा होता हे बघूया…

” घरीच गाण्याचे गुरु “

माझ्या घरात चार पिढ्या गाण्याची परंपरा आहे  , त्यामुळे अर्थात गाणं हे घरून शिकलो माझे काका पंडित बाबुराव बोरगांवकर , माझ्या वडिलांकडून सुद्धा गाणं शिकलो त्यामुळे माझ्या गाण्याचे सगळेच गुरु घरात आहेत पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटत माझ्या समोर एक संधी चालून आली ती म्हणजे माझ्यासाठी अविस्मर्नीय कधीही विसरणार नाही अशी गाणं सरस्वती किशोरी ताईकडे मला काहीवर्षे मला गाण्यासाठी मार्गदर्शन मिळालं हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईन्ट होता . एका वेगळ्या पद्धतीचं गाणं काय असत , किंवा त्या उंचीच गं शिकताना पण किती आनंद मिळतो , खूप शिकायला मिळत याची जाणीव मला तेव्हा झाली आणि सोबत सारेगमच्या प्रवासात अनेक दिग्गज गायक , कलाकार मला भेटले त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वाटेवर मिळत गेलं तर आयुष्यातील हे टप्पे फार अविस्मरणीय आहेत . मला दरवेळी नवं  काहीतरी शिकायला आवडत , माझ्या गाण्यातले नवीन बदल टिपायला आवडतात या सगळ्यामागे हि दिग्ग्ज लोक आहेत . मी भाग्यवान आहे कि अश्या लोकांच्या संगती मुळे गाण्याचा नवीन दृष्टीकोन सापडत गेला या सगळ्यामुळे मी घडत गेलो मोठा होतोय हे असच चालू राहावं   ज्यामुळे माझ्या गाण्यात बदल होतात .

“ सगळीच गाणी  जवळची “

मी गायलेल्या गाण्या पैकी ”  तुझ्या विना , उसवले धागे , नाही कळले कधी ” हि तीन गाणी माझ्या फार जवळची आहेत . हि गाणी ज्या तऱ्हेनं आम्ही गायली होती किंवा संगीतबद्द , रेकॉर्ड केली गेली यावर मेहनत घेऊन केली होती आणि रसिकांनी या गाण्यांना भरभरून प्रेम दिलंय . सगळ्यांना आज सुद्धा हि गाणी लक्षात आहेत या गाण्यामुळे मला सुद्धा अनेक गोष्टी मिळाल्या . या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत , माझ्या “दिवाना झालो मी ” या अल्बम मधली गाणी सुद्धा आवडतात . हा पहिला अल्बम जो अशोक पत्की यांनी कंपोज केला इथून खरी सुरुवात झाली . अशी खूप गाणी आहेत जी मला आवडतात , आणि जवळची आहेत आणि या गाण्यामुळे माझ्या सांगीतिक जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली .

” वेस्टर्न च्या सोबतीने लोकसंगीत “

मला असं वाटत कि एवढ्या वर्षात मला रोमँटिक , लाइट मूड अश्या पद्धतीची गाणी मला गायला मिळाली आहेत . माझ्या आवाजाची स्टाईल हि शास्त्रीय आहे त्यामुळे बाकी जॉनर असतील किंवा लोकसंगीत असेन हि माझ्या पठडीतली गाणी नाही आहेत. पण हि गाणी मला तेवढीच आवडतात  त्यामुळे वेस्टर्न गाणी आणि आपल्या मातीतले काही संगीत प्रकार मला छान गायला मिळावेत . जेणेकरून आपल्या मातीशी असलेली एक नाळ जोडता येईन , तर अश्या प्रकारे वेस्टर्न आणि आपल्या मातीतलं लोकसंगीत यावर प्रयोग करून अश्या तर्हेची गाणी गायला मला नक्कीच आवडतील .

” गायना शिवाय अनेक गोष्टीची आवड “

गायना  व्यतिरिक्त खूप गोष्टी आवडतात . मी स्पोर्ट्स प्रेमी आहे , मला खेळायला खूप आवडत आणि बघायला सुद्धा आवडतात . या सोबतीने चित्रकला आवडते , चित्र काढायला आवडतात ,फोटोग्राफी ,  फिल्म्स बघायला , मित्रा सोबत रहायला , शॉपिंग अश्या अनेक गोष्टी गण्या सोबत मी एन्जॉय मारून टायचा मनमुराद आनंद घेत असतो .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER