मी हात जोडून माफी मागतो…”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणचा माफीनामा

Aditya Narayan -amey khopkar - Maharashtra Today

मुंबई :- डियन आयडल शो चा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसे (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी आदित्य नारायण यांना इशारा दिला होता. त्यानंतर आदित्य नारायणने फेसबुक पोस्ट करत अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्य नारायण म्हणतो की, मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो.

ही बातमी पण वाचा : …तर कानाखाली आवाज काढेन ; आदित्यच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेच्या नेत्याचा संताप अनावर 

माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे असं त्याने म्हटले आहे.

आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” ? असे म्हटले होते. आदित्यच्या अशा बोलण्यावरुनच नवा वाद उफाळला. अलिबागविषयी असे बोलल्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीकास्त्र सोडण्यात आले . तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला खडसावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button