यूएफओचे (UFO) व्हीडीओ मी पाहिले आहेत! – बराक ओबामा

Maharashtra Today

परग्रहवासी एलियन्स हे मानवासाठी कुतूहलाचा विषय राहिले आहेत. ‘द लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डन’ ( (The Late Late Show with James Cordon))या कार्डं या कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा((Barack Obama) ) यांनी याबाबत काही माहिती असल्याचे सांगितल्यानंतर खळबळ उडाली आहे.

ओबामा म्हणालेत की, एलियन्सबाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत. २००८ ला राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एलियन्सबाबत काही नवी माहिती मिळू शकते का, याबाबत मलाही उत्सुकता होती. एखाद्या लॅब (प्रयोगशाळेत) एलियन्सच्या यूएफओ (उडत्या तबकड्या) ठेवल्या आहेत का, हे जाणून घ्यायची मला जिज्ञासा होती.

ही बातमी पण वाचा :- ‘पाण्यात उतरण्यापूर्वी’ यूएफओने (UFO)अमेरिकन नौदलाच्या जहाजाजवळ केले उड्डाण, व्हिडीओ व्हायरल

पण, असे कळले की, अशी कोणतीही लॅब नाही. मात्र, अनेक व्हीडीओत आकाशात अज्ञात वस्तू / यान उडत असल्याचे फुटेज दिसते हे खरे आहे. या अज्ञात यूएफओ काय आहेत याचा मात्र अजून उलगडा झालेला नाही. त्या उडतात कशा, हे कळू शकले नाही.

या यूएफओ (UFO) अमेरिकेच्या महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांजवळ उडत होत्या याचे व्हीडीओ मी पहिले आहेत. पण, त्यांच्या उडण्याची पद्धत लक्षात येत नाही आणि त्यांच्या हालचाली व वेग अमेरिकेच्या लष्करापेक्षा कितीतरी जास्त आहे.

या यूएफओ म्हणजे नेमके काय आहे, हे अजून सांगता येत नाही पण, हा विषय सोडून देण्यासारखा नाही. यावर बारीक लक्ष ठेवून असले पाहिजे, असे मला वाटते. मात्र, याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे कोणताही अहवाल नाही.

ही बातमी पण वाचा :- १४ यूएफओ अमेरिकेच्या नौदलाला सॅन डिएगोच्या सागर किनाऱ्यावर दिसल्या होत्या !  

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नौसेनेचे लेफ्टिनेंट रायन ग्रेव्स म्हणाले होते की, २०१५ ते २०१७ या काळात मी अनेक यूएफओ पाहिल्या आहेत. त्या वर्जेनियाच्या प्रतिबंधित हवाई हद्दीत दिसत होत्या!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button