मी भाजपा सोडलेला नाही, राजीनामाही दिलेला नाही – एकनाथ खडसे

Eknath Khadse

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्यासुद्धा चर्चिल्या जात आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी स्वत: पक्षांतराच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला आहे. मी भाजपा हा माझा पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र एकनाथ खडसे यांनी मी पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान, राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा असतो, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे असं काही करणार नाहीत, याबद्दल मी ठाम असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे 21 तारखेला मुलीसोबत मुंबईत येणार असून, ते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तसेच मी अद्यापपर्यंत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असंही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER