त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावे; पण, मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, : एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यासंबंधी एकनाथ खडसेंशी संवाद साधला असता एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असेही त्यांनी सांगितले. ते टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (ED issues summons to NCP leader Eknath Khadse)

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे सीडी लावून धमाका करणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस : ईडी ( ED) दाखवली तर आता सीडीही निघणार, राष्ट्रवादीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER