छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार यापूर्वी बघितलं नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता आणखीनच चिघळला आहे. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर अतिक्रमणविरोधी कारवाई केली; पण मुंबई उच्च न्यायालयानं या कारवाईला स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली, अशी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. आपल्या विचारांचा विरोध करणारे व्यक्ती असतील, पत्रकार असतील या सर्वांना दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अवैधपणे होत आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याचा महाराष्ट्राचा किंवा मुंबई पेलिसांचा अवमान होतो, त्याचं समर्थन करता येत नाही.

पण, सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही. या कृतीमुळे उभ्या देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. काल-परवापर्यंत ते बांधकाम तिथे होतं, तेव्हा कारवाई केली जात नाही. पण, अचानक कुणी तरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते. मग अन्य अवैध बांधकामांवर सरकार कारवाई का करत नाही? केवळ बदला घेण्याच्या भावनेनं केलेली कारवाई, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. राज्य सरकारला शोभणारी नाही. महाराष्ट्रात एकप्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे. ’ असेही फडणवीस म्हणाले.


 

ही बातमी पण वाचा : आमच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारला टिकवता आले नाही : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER