‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई :- शिवसेनेनं आज ‘सामना’तून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामनाच्या टीकेला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीनं पाच वर्षे जरूर सरकार चालवावं, त्यांना शुभेच्छा आहेत; पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, असे फडणवीस म्हणाले. ‘सामना’ रोज आपली भूमिका बदलतो. कधी पवारसाहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार पवारांच्या प्रयत्नातून अवतरले आहे; विरोधकांनी अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविणे बंद करावे – शिवसेना

त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, फडणवीस यांनी ‘सामना’च्या भूमिकेवर बोलताना बाळासाहेबांच्या वेळेसचा सामना, अशी दुटप्पी भूमिका मांडणारा नव्हता असेही म्हटले आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे? भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, अशा शब्दांत फडणवीसांनी सामनावर टीका केली आहे. “त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचं काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्षं सरकार चालवावे.” असे फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER