अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही – विनायक मेटे

Ashok Chavan - Vinayak Mete

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राजकारण अधिक पेटले आहे . शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही. त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मेटे यांनी केली आहे. चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काहीच केलं नाही. त्यांनी उपसमितीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. अशोक चव्हाण खोटं बोलत आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) त्यांनी नीट काम केलं नाही, असंही मेटे म्हणाले.

दरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. काही मंत्री ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER