‘राजगृह’ पोलिसांना घटनेची चौकशी करुन दोषींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत : गृहमंत्री

Rajgruha - Anil Deshmukh

मुंबई :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरातून निशेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांना घटनेची चौकशी करुन दोषींना अटक करण्याचे निर्देश दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी

या तोडफोडीत घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेेरे, घराच्या काचा फुटल्या. कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER