‘वाझेमुळे सरकार संकटात सापडेल, हा इशारा आधीच दिला होता’, संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut - Sachin Vaze - Maharashtra Today

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावर मोठं आणि तितकंच सूचक विधान केलं आहे. “सचिन वाझे याला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा जेव्हा निर्णय होत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सल्ला दिला होता. वाझेच्या कार्यपद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडू शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी काल प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी अशा प्रकारचा दावा केला. मी पक्षाच्या काही नेत्यांना तसा इशारा दिला होता. मी त्या नेत्यांचे नाव सांगू शकत नाही. पण आमच्यात जे संभाषण झालं त्याची सर्वांना माहिती आहे, असंदेखील संजय राऊत यांनी सांगितलं. सचिन वाझे  प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला चांगला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला, असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधी कधी परिस्थिती त्यांना तशी बनवते, असंही ते यावेळी म्हणाले.

जेव्हा सचिन वाझेला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा सेवेत घेण्याची योजना आखली जात होती तेव्हाच मी काही नेत्यांना इशारा दिला होता. वाझे आपल्यासाठी अडचण ठरू  शकतात. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार संकटात सापडू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सचिन वाझे यांचं समर्थन केलं होतं. सचिन वाझे दहशतवादी नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत राऊत यांना विचारलं असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना तेव्हा वाझेच्या कामांबाबत माहिती नव्हती, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button