नागपूरला ज्याची गरज होती ते काम मी आधीच केले; प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर

CM Fadnavis-Prakash Ambedkar

मुंबई :- राज्यात सर्वत्र कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करत कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा नागपुरात बसावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : एकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता, उर्वरीत महाराष्ट्र बेवारस ठेवला – प्रकाश आंबेडकर

आत्मा मलिक ज्ञानपीठाच्या संजीवनी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडवणीस कोपरगाव येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याला प्रत्युत्तर देत ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मी आधीच हे सुरू केले आहे, हे त्यांना माहिती नसावे. नागपूरमध्ये जे काही काम करायचे आहे ते मी आधीच केले आहे. नागपुरला (Nagpur) ऑक्सिजनची गरज होती, तो आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसेच सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना कदाचित माहिती नसावे, ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button