
सिंधुदुर्ग :- वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा नारायण राणे (Narayan Rane) यांनी फेटाळून लावला आहे . मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा राणे यांनी केला . ते सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
दरम्यान नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.
ही बातमी पण वाचा : नितेश राणेंना फडणवीसच तुरुंगात टाकणार होते, राऊतांचा गौप्यस्फोट
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला