
मुंबई :- काँगे्रसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात राष्ट्रीय नेते म्हणून जे गुण असायला हवे, ते नाहीत. त्यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसून येत आहे, असा चिमटा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शुक्रवारी काढला.माजी खासदार आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची मुलखात घेतली . यावेळी ते बोलत होते .
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या राहुल गांधींवरील टीकेवरही आक्षेप घेतला. ते पत्रकारांशी बोलत होते. ओबामांनी अलिकडेच आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, राहुल गांधी एखाद्या शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे दिसतात, ज्याच्याकडे कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्याची योग्यता आणि उत्कटता नाही.
ओबामा यांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले की, मी माझ्या देशाच्या नेतृत्वाबद्दल काहीही बोलू शकतो, पण दुसर्या देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलणार नाही. एखाद्याने ती मर्यादा पाळायला हवी. मला वाटते की, राहुल गांधींविषयी वक्तव्य करून ओबामा यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. राहुल गांधी यांना देशातील नागरिक नेता म्हणून मानण्यास तयार आहेत का, यावर पवार म्हणाले, या संदर्भात काही प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्य नसल्याचे दिसते. कोणत्याही पक्षाचे नेतृत्व संघटनेत कसे स्वीकारले जाते, यावर अवलंबून असते, असे पवारांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी यांच्याशी माझे मतभेद होते, तरीही…
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना आहे, असे पवार म्हणाले .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला