मी सीडीआर मिळवला, माझी खुशाल चौकशी करा; फडणवीसांचे ठाकरे सरकारला खुले आव्हान

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये वादंग पेटले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ‘या प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे, तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल’ अशी घोषणा केली. त्यानंतर ‘सचिन वझे (Sachin Vaze) यांना गृहमंत्रीच पाठीशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. तसंच, मी फोनचा सीडीआर मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. मनसुख हिरेन प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर केले. यावेळी, ‘मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणावर खुलासा करत गृह राज्यमंत्री प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला.

या प्रकरणी एसआयटी स्थापन करत असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा (Mansukh Hiren Suicide Case) तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे, जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय.’ असा आरोप फडणवीस यांनी केला. ‘कोणत्याही पक्षाचा गुन्हेगार नसतो, वझेला पहिले निलंबित करा. हायकोर्टाच्या आदेशाने वझे निलंबित झाले, आम्ही आमच्या सरकारने त्यांना सेवेत घेतलं नव्हतं, यांच्या एका पुनर्विचार समितीने त्यांना घेतलं’ असंही फडणवीस म्हणाले. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

मुळात या प्रकरणात कोणतीही याचिका दाखल केली नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही. यांना अभिमान वाटतो की लोक इथे येऊन आत्महत्या करतात. पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं? इतके पुरावे देऊन काही कारवाई होत नसेल मग आम्हाला तुमच्यावर संशय आहे, असा आरोपच फडणवीस यांनी केला. आताच्या आता वझे यांना निलंबित करा आणि अटक करा, अशी मागणी करत भाजपचे आमदार जागेवरून उठले आणि गृहमंत्री हाय हायच्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षाकडे सीडीआर कुठून आला, त्यांना काय अधिकार आहे, विरोधी पक्षनेत्यांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ‘होय, मी सीडीआर मिळवला माझी चौकशी करा, पण जे खुनी आहेत त्यांची चौकशी करा. आम्हाला धमक्या देता का? खुनी मिळाला नाही तर त्या पलीकडचीही माहिती काढेन’ असे आव्हानच फडणवीस यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : ‘या’ दोन गोष्टीदेवेंद्र फडणवीसांच्या हाती लागल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER