शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय – सुप्रिया सुळे

NCP - Supriya Sule - Sharad Pawar - Farmers Protest

मुंबई : गेले दोन तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीेमेवर केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या नवीन कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

काल शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपुरला जाऊन शेतक-यांची भेट घेतली. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार, संसदपटू सुप्रिया सुळे (Supriya Sule) शेतक-यांची भेट घेणार आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतंय अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव:… परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिसा सुळे यांनी म्हटलं आहे. त्या ‘एएनआयशी’ बोलत होत्या.

आज गाझीपुरला जाऊन शेतक-यांसी चर्चा करणार असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे –
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं सुळे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER