पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही : प्रवीण दरेकर

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली आहे.

दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणलो की, मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान कोरोना स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मात्र, या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कामाचे कौतूक केले असल्याचे वृत्त आले होते. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय. पंतप्रधान कार्यालयाने असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button