नारायण राणे कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले माहिती नाही : सुप्रिया सुळे

Supriya Sule-Narayan rane

मुंबई :- राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. जर हे सरकार स्थापन झाले नसते . तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आज भाजपात असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती, असा दावा भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केला होता . राणे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

नारायण राणे कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले माहिती नाही , असे सुळे म्हणाल्या .

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य करून नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. जयंत पाटील स्वतःच भाजपमध्ये येण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला होता. त्याला मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ट्वीटरद्वारे राणे यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, ‘नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत हे जाणून मला खेद वाटला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी मी कधी, कुठे चर्चा केली याचा तपशील मला कळला तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. माझ्यापुरते सांगायचे झाले तर, माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजप मध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही, म्हणून हा खुलासा’, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केले  जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथ यांना  इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER