अजित पवार कोणत्या राजकीय बुद्धीने काम करतात कळत नाही, पंकजांची बोचरी टीका

Pankaja Munde - Ajit Pawar

मुंबई : मराठवाड्याच्या विकासाचा आणि त्या १२ आमदारांचा संबंध काय? उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विधान दुर्दैवी आहे. ते कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन धारेवर धरले. उत्तरात अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावे जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु! पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ झाला.

यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दादांचे पोटातले ओठावर आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या जनतेला ओलीस ठेवले का? असा तिरकस प्रश्न विचारून इशारा दिला की, यासाठी तिथली जनता माफ करणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER