मी मास्क घालतच नाही – राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई :- मराठी भाषा दिवसाच्या (Marathi Language Day) निमित्ताने आज दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मनसेने (MNS) मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित झालेत. परंतु आजही ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्यामुळे मुक्यमंत्र्यांचे धाकटे भाऊ असलेले राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठ्या मुख्यमंत्री बंधुंच्या विरोधातच जायचं असंच ठरवलंय का अशीच चर्चा परिसरात रंगली.

शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray), मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावलेला नव्हता.

पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रात कोरोनाने (Corona) पुन्हा युटर्न घेतला आहे. त्यामुळे मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत कधीही तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. त्यामुळे साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसला की हा चर्चेचा विषय ठरतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER