कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही; फडणवीस यांचा सरकारला टोमणा

Fadnavis-CM Thackeray

मुंबई : माझी दोन नंबरची कामं नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) काय, इतर कोणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचे राजकारण करते आहे, असा आरोप फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

नागपूर महापालिकेचे (NMC) माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयीच्या प्रश्नावरच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर इतका केली. तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केल्यापासून नागपुरात आयुक्त विरुद्ध भाजपा (BJP) असं वाद निर्माण झाला होता. अनेक वेळा हा वाद सार्वजनिक झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari)यांनीही यात लक्ष घातले होते. दरम्यान, अचानक तुकाराम मुंढे यांची नागपूर (Nagpur) येथून बदली करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,”मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली असेल, तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण माझी दोन नंबरची कामे  नाहीत. तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही.”

शेतकरी विधेयकांची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. राजकारण आहे. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात ‘आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू’ असे म्हटले होते. सत्तेत आलो नाही, तर हे करू देणार नाही, असेही म्हणायला हवे होते. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अंमलबजावणी करावी लागेल, असा टोमणा त्यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER