मी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात नाही : नितीन गडकरी

Nitin-Gadkari

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवणुकीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सप्ष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीदरम्यान दिले. भाजपचं नेतृत्व केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देणे ही काळाची गरज आहे असं मत अनेकांनी व्यक्त केले .

ही बातमी पण वाचा : भाजपचं नेतृत्व नितीन गडकरींकडे देण्याची मागणी !

दरम्यान पाच राज्यातील भाजपच्या पराभवानंतर नितीन गडकरींच्या समर्थकांकडून ”राज तिलक की करो तैयारी, आ रहे है नितीन गडकरी” अशा आशयाचे फलक लावले होते. मात्र पंतप्रधान पदाच्या प्रश्नावर गडकरींनी आपण स्वप्न पाहत नाही असे उत्तर दिले. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना हे माहित असल्याचे ते म्हणाले .

ही बातमी पण वाचा:- राम जन्मस्थळीच मंदिर उभारण्यात येणार : नितीन गडकरी

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . भाजपाला विजय प्राप्त झाला तरीही मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील, असेही ते म्हणाले .

ही बातमी पण वाचा:- शिवसेना – भाजपचे दृढ संबंध आहे, युती होणार! – नितीन गडकरी