
मुंबई :- आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर माध्यमांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला यावेळी राऊत यांनी विरोेधी पक्षासोबतच्या कटु गोड संबंधांबाबत विचारले. तेव्हा संजय राऊत यांनी सावध उत्तरं दिली आहेत.
मी भाजपला (BJP) विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत. मुळात राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आम्ही भाजपसोबत 25 वर्षे जवळून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व असण्याचं कारण नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. आहे.
तुम्ही विरोधी पक्षाला मकरसंक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले.
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपा सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे. मकरसंक्रांतींच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करतो की, विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ही बातमी पण वाचा : राजकारण्यांनी भान ठेवावं, शरद पवार हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील – संजय राऊत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला