वॉशिंग्टनवर आहे एकच व्यक्ती नाराज, तीसुध्दा अगदी जवळची, ती कोण?

ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) ‘सुंदर’ खेळ बघून लाखो त्याचे दिवाने झाले आहेत.त्यात नामवंत क्रिकेटपटूसुध्दा आहेत. वॉशिंग्टनबद्दल कुणी नाराज असल्याचे गेल्या दोन दिवसात तरी दिसणार नाही पण एक व्यक्ती मात्र वॉशिंग्टनवर नाराज आहे आणि ती व्यक्ति त्याच्यासाठी फार फार प्रिय आहे.

ती व्यक्ती म्हणजे त्याचे वडील एम. सुंदर. वॉशिंग्टनने कसोटी पदार्पणातच तीन गडी बाद केल्यानंतर 62 धावासुध्दा केल्या आणि सातव्या गड्यासाठी शार्दुल ठाकूरसोबत 123 धावांची भागिदारी केली. मात्र एवढ्याने एम. सुंदर यांचे समाधान झाले नाही. वॉशिंग्टनने शतक केले नाही ही त्यांची नाराजी आहे. त्यांच्यामते वॉशिंग्टनकडे कसोटीत शतक झळकावण्याची क्षमता आहे. सिराज फलंदाजीला आला तेंव्हा त्याने अधिक आक्रमक खेळ करायला हवा होता. फटके मारायला हवे होते आणि ऑस्ट्रेलियन धावसंख्येची बरोबरी करण्याचे प्रयत्न करायला हवे होते असे त्यांनी म्हटले आहे.

ते सांगतात की माझी दररोज वॉशिंग्टनशी बातचीत होत असते आणि संधी मिळाली तर मोठी खेळी करायची हे मी त्याला सांगितले होते. आणि त्याने मला तसे प्रॉमिसही केले होते.पण तो शतक करु शकला नाही म्हणून ते नाराज आहेत. पण ही नाराजी प्रेमापोटी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER