“ते ट्विट मी केले नव्हते” – किशोरी पेडणेकर

Maharashtra Today

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) त्यांच्या एका ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. वाद निर्माण झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी ते ट्विट डिलीट केले. या वादावर – ते ट्विट मी नाही तर शिवसैनिकाने केलं होते असे स्पष्टीकरण दिले. ‘त्या’ शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे सांगितले.

आज पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांना या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यांनी सांगितलं की, “बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम सुरू असताना मी मोबाइल जवळ ठेवत नाही. माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केले.

“ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केले व ट्विट करणाऱ्याला परत माझ्याकडे यायचे नाही असे सांगितले, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

प्रकरण

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेले ग्लोबल टेंडर आणि त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

यावर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असे म्हटले. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी ट्विट डिलीट केले.

ही बातमी पण वाचा : ‘टेंडर कोणाला मिळाले’ विचारणाऱ्याच्या बापाचा किशोरी पेंडणेकरांनी केला उध्दार म्हणाल्या …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button