‘मी तसं म्हणालोच नाही’, अशोक चव्हाणांचा यू-टर्न

ashok-chavan

नांदेड : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी परभणी येथे केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याचं वृत्त प्रकाशमाध्यमांमध्ये झळकताच चव्हाण यांनी आपल्या विधानावरून यू-टर्न (U-Turn) घेतला आहे. मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.

काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत ते आज नांदेडमध्ये बोलत होते.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय ; अशोक चव्हाणांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER